हडबीची शेंडी प्रस्तरारोहण मोहीम (Hadbichi Shendi) - Thumbs Up Pinnacle
- Durgpremi
- Mar 16, 2017
- 1 min read

ठिकाण - मनमाड
सुळका - हडबीची शेंडी सुळक्याची उंची - 150 फूट, समुद्रसपाटीपासून - १९०२ फूट.
पाणी - पायथ्याच्या गावातील विहिरीतून. प्रस्तरारोहणस लागलेला वेळ - ४.०० तास.
दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने या मोहिमेचे 16 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. गणेश पठारे, युवराज किनिंगे, स्वप्नील गरड, अनिकेत बोकिल, श्रीनाथ शिंदे, सदगुरू काटकर, गोपाल भंडारी, सुनील पिसाळ, धनंजय सपकाळ या मोहिमेत सहभागी झाले होते. मोहिमेला 16 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली. आरोहक म्हणून सद्गुरू काटकर व गोपाल भंडारी यांनी प्रथम शिखर सर केले. पायथ्यापासून शिखरापर्यंत आरोहण करताना काही ठिकाणी मेखा, पाचरी यांच्या सहाय्याने दोर लावून इतर सहका-यांना आरोहणाचा मार्ग सुकर केला.
शिखर सर करताना सुळक्याचा खडक बराच सैल व निसरडा असल्यामुळे माती व खडक निसटत होती. तरीदेखील 39 डिग्री अंश सेल्सियसच्या तापमानात आणि निसटणा-या खडक व मातीपासून योग्य प्रकारे सुरक्षितता घेत सद्गुरु काटकर व गोपाल भंडारी यांनी सुळका सर केला. 11 वाजून 20 मिनिटात पहिला शिखर माथा गाठला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला. त्यानंतर सर्व अरोहकांनी शिखर सर केले. दुपारी साडेचार वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती.

सदस्यांची शारीरिक क्षमता वाढविणे. कडाक्याच्या उन्हातही योग्य निर्णय घेऊन शिखर सर करण्यासाठी, एवढ्या तापमानात ही मोहीम आयोजित केली होती, असे दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अडसूळ यांनी सांगितले. मोहिमेला लागणारे तांत्रिक साहित्य सद्गुरू काटकर व गोपाल भंडारी यांनी उपलब्ध केले. मोहीम पूर्णत्वाची जबाबदारी सुनील पिसाळ आणि गणेश पठारे यांनी सांभाळली.
Comments